# Vidharbh live > Vidharbhlive News ## Posts - [मुरूमाच्या वादातून महिलेस मारहाण; पाच जणांवर गुन्हा](https://vidharbhlive.com/crime-20/): मेरा बु. : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री रामेश्वर केदार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या संगीता प्रल्हाद नागरे यांच्या कुटुंबीयांसोबत छोट्या-मोठ्या कारणांवरून नेहमीच वाद होत असतात. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास संगीता नागरे या फिर्यादीच्या घरासमोर येऊन “तुम्ही आमचा मुरूम घेतला” असा आरोप करत वाद घालू लागल्या. फिर्यादीच्या आईने आरोप फेटाळत “आम्ही मुरूम घेतलेला नाही” असे सांगितल्यावर वाद अधिक चिघळला. यावेळी संगीता नागरे... - [घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला; संजय नगरात खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा](https://vidharbhlive.com/crime-19/): देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दे. राजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीनबी इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी म्हणून मेधा सतीश घाटे, तन्मय प्रकाश घाटे व राहुल ओमकार घाटे (तिघेही रा. साईनगर, देऊळगाव राजा) यांची नावे नमूद आहेत. ही घटना १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता घडली. तक्रारदार महिला घरी असताना आरोपी त्यांच्या घरात घुसले. त्यांनी ‘इकबाल खान कुठे... - [भीमजयंतीच्या रॅलीनंतर रक्तरंजित शेवट! युवकाचा चाकूने खून; आरोपी फरार](https://vidharbhlive.com/bul-13/): बुलढाणा : भीमजयंतीच्या उत्साहात रंगलेल्या शहरात रॅलीनंतर काही तासांतच एका युवकाचा निर्घृण खून झाल्याने बुलढाणा शहर हादरले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील कैकाडीपुरा परिसरात ही थरारक घटना घडली असून, हल्लेखोर अद्याप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ येथील राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू हा भीमजयंती रॅलीत सहभागी झाला होता. रॅली संपल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास तो बाजार लाईन परिसरातील लालाजी आईस्क्रीम दुकानासमोर उभा असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सोनू वसंत जाधव (वय २५) या युवकाने गुप्तीने पप्पूवर सपासप वार केल्याचे समोर आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात पप्पूला बचावाची कोणतीही संधी न मिळाल्याने तो जागीच कोसळला.... - [मालवाहू वाहनाच्या धडकेत होमगार्ड जवानाचा मृत्यू](https://vidharbhlive.com/sishsodddl/): चिखली :- पोलिस स्टेशनच्या होमगार्ड युनिटमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी घडली. आत्माराम उत्तम वखरे (रा. सवणा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम वखरे हे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास टपाल घेऊन दुचाकीने चिखलीहून बुलढाण्याकडे जात होते. दरम्यान, केळवदसमोरील शेताजवळ ते थांबले असता बुलढाण्याकडून येणाऱ्या एमएच-२८-बीबी-७३६० क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आला असून, या प्रकरणाचा... - [घरफोडीत १.७३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी; डोणगावात चोरट्यांचा धुमाकूळ!](https://vidharbhlive.com/bwkshslddl/): डोणगाव :- येथील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी ९ ते १३ एप्रिलदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उघडून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले. यामध्ये अंगठ्या, झुमके, रिंग, नथ तसेच सुमारे २० ग्रॅम वजनाचे गंठण यांचा समावेश आहे. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी डॉ.... - [शेतातील सौरपंप साहित्याची चोरी; शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान](https://vidharbhlive.com/hsouspsbsl/): लोणार :- तालुक्यातील देऊळगाव वायसा येथे शेतातील सौरपंपाशी संबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेतकऱ्याचे सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा आश्रुबा सोनुने (वय ४४) यांच्या गट क्रमांक ३१३ मधील शेतात शासनाच्या अनुदानातून सौरपंप बसविण्यात आला होता. २ एप्रिल रोजी संध्याकाळी ते शेतातून घरी परतले होते. दरम्यान रात्री वादळी वातावरण असल्याने ते पुन्हा शेतात गेले नव्हते. ३ एप्रिल रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर सौरपंपाच्या तीन प्लेटा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील पाहणीत विहिरीतील ३ एचपी सौरपंप, सुमारे ९० फूट पाइप व १२० फूट केबलसह इतर साहित्य चोरीला गेल्याचे उघड झाले. या प्रकरणी... - [क्षणात घेतलेला निर्णय ठरला जीव वाचवणारा! ऑटोला वाचवताना कैरीने भरलेला ट्रक पलटी; हॉटेल सूर्या नजीकची घटना](https://vidharbhlive.com/haotsowktosb/): मलकापूर: वेगात धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत एका क्षणाचा निर्णय किती महत्त्वाचा ठरतो, याचा प्रत्यय आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आला. समोरून येणाऱ्या ऑटोला धडक होऊ नये म्हणून ट्रक चालकाने घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, मात्र त्याच वेळी कैरीने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. आज पहाटे सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास टाटा मोटर्ससमोर हा अपघात झाला. मलकापूरहून मुक्ताईनगरकडे निघालेला (क्रमांक RJ 09 GE 8587) कैरीने भरलेला ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोला वाचवण्यासाठी अचानक वळवण्यात आला. या अचानक घेतलेल्या वळणामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघाताच्या धडकेत ट्रकमधील कैऱ्यांच्या पेट्या रस्त्यावर विखुरल्या गेल्याने... - [समृद्धी महामार्गावर बॅटऱ्यांनी भरलेला ट्रक जळून खाक; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला](https://vidharbhlive.com/meh/): मेहकर :- तालुक्यातील दुसरबीडजवळ मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून तो काही क्षणांतच जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर येथील चालक रोहित कुमार हा यूपी ६५ आरडी २१४० क्रमांकाच्या ट्रकमधून बनारस येथून नाशिकच्या दिशेने इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या घेऊन निघाला होता. सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास दुसरबीड परिसरातील चॅनेल क्रमांक ३१२ जवळ ट्रकमधून धूर निघू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. धूर दिसताच चालकाने तातडीने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला; मात्र काही वेळातच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण ट्रकला वेढले. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस... - [महामार्गावर अपघातानंतर कार-दुचाकी पेटली; तिघे जखमी, चिमुकल्यासह कुटुंबाचा थरारातून बचाव](https://vidharbhlive.com/accident-15/): मलकापूर :- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी-धानोरा दरम्यान कार आणि दुचाकीची धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात तिघे जखमी झाले असून काही काळ घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील तुषार पाटील (वय ३१) आणि रुचिता पाटील (वय २९) हे दाम्पत्य आपल्या १० महिन्यांच्या बाळासह नागपूरहून परतत होते. त्याचवेळी पांडुरंग वानखेडे (वय ४१, रा. वडनेर भोलजी) हे दुचाकीने रस्ता ओलांडत असताना कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघातानंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने दाम्पत्याने बाळासह वेळेत वाहनाबाहेर पडत जीव वाचवला, तर दुचाकीस्वार... - [जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; दोन जण जेरबंद, मोबाईलसह रोकड जप्त](https://vidharbhlive.com/jsishsossv/): शेगाव : शहर पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे संविधान चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत मोबाईल, रोकड व इतर साहित्य असा जवळपास २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ ते ५.५५ वाजताच्या दरम्यान ज्योतिबा सदन येथे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनी यशोदा कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अचानक छापा टाकला. या कारवाईत उमेश महादेव खेरडे (३१, रा. माळीपुरा) आणि बंडू रघुनाथ कंकाळे (३१, रा. ताडपुरा) यांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यात आरोपींकडून विविध... - [रस्त्याच्या हक्कावरून वाद चिघळला; घरासमोर येत दाम्पत्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/jaisuspdbdk/): मेरा बु.:- अंढेरा गावात शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या हक्कावरून सुरू झालेला वाद चिघळत थेट घरासमोर येऊन मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगीता प्रल्हाद नागरे (वय ४५) या १२ एप्रिल रोजी घरी परतत असताना रामा प्रल्हाद केदार यांच्या शेतातून जात होत्या. यावेळी “या रस्त्याने येऊ नका” असे सांगत आरोपींकडून त्यांना अडवण्यात आले. त्यावरून दोघांत वाद निर्माण झाला व शिवीगाळ करण्यात आली. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन संगीता नागरे व त्यांच्या पतीवर चापट-बुक्क्यांनी हल्ला केला. तसेच भाग्यश्री रामा केदार व चंद्रभागा प्रल्हाद केदार यांनीही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत... - [बसस्थानकात कर्मचाऱ्यावर हल्ला; टॅक्सीचालकावर गुन्हा, देऊळगाव राजा येथील घटना!](https://vidharbhlive.com/jaohslssbk/): देऊळगाव राजा :- शहरातील बसस्थानक परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर प्रल्हाद खरात (वय ५४, रा. बोराखेडी बावरा) हे बसस्थानकात कर्तव्यावर असताना संबंधित आरोपी अक्षय तोडे (रा. सिंदखेड राजा) हा प्रवासी वाहतूक करणारे वाहन बसस्थानकात आणून प्रवासी घेत होता. यावेळी खरात यांनी त्यास थांबवून नियमांची माहिती दिली. याचा राग मनात धरून आरोपीने थेट चौकशी कक्षात जाऊन खरात यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध... - [मध्यरात्री घरफोडी; दागिने व रोकड असा २.११ लाखांचा ऐवज लंपास! पिंप्रीगवळी येथील घटना](https://vidharbhlive.com/hsus8soev/): खामगाव :- तालुक्यातील पिंप्री गवळी येथे चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शक्तीसिंह प्रकाशसिंह तोमर (वय ४१) हे १० एप्रिलच्या रात्री कुटुंबीयांसह घराच्या हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी बाहेरून खिडकीतून घरात प्रवेश करून पाहणी केली असता, बेडरूममधील कपाटे उघडी असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध... - [लग्न मिरवणुकीत डीजेवरून वाद; १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा! खामगाव तालुक्यातील घटना](https://vidharbhlive.com/khm-24/): खामगाव :- तालुक्यातील जयपूर लांडे येथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान डीजेवरील गाण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान लग्नाची मिरवणूक सुरू असताना डीजेवरील गाण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत काहींना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी परमेश्वर गोपाल बेलोकार (वय ३२, रा. जयपूर लांडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. - [किरकोळ वादातून काका-भाच्यावर सळईने हल्ला; तिघांवर गुन्हा, घाटपुरी येथील घटना!](https://vidharbhlive.com/khm-23/): खामगाव :- येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घाटपुरी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणासह त्याच्या काकावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गणेश हरसिंग सोळंके (वय ३३) यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. त्यांच्या भाच्याने शेजारील मुलीशी संवाद साधल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी भाच्याला मारहाण सुरू केली. भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या काकांनाही आरोपींनी लक्ष्य करत लाठी-काठ्या आणि लोखंडी सळईच्या साहाय्याने दोघांवर हल्ला केला. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी १० एप्रिल रोजी पहाटे शिवाजीनगर पोलिस... - [भरधाव ट्रकचा कट; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे जखमी](https://vidharbhlive.com/hejsivsksb/): मोताळा : बुलढाणा – मलकापूर रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (१० एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्रिमूर्ती पेट्रोलपंपाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत तरुणाचे नाव सचिन हनुमान तिवारी (रा. राजूर) असे असून पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजूर येथील सचिन तिवारी, पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे तिघे एमएच २८ बीएम ७१९३ क्रमांकाच्या दुचाकीने दवाखान्याच्या कामासाठी मोताळा येथे जात होते. दरम्यान, त्यांनी मार्गात... - [पहूरजिरा येथील एकाच रात्री ३ घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ; ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास](https://vidharbhlive.com/jskshslrl/): जलंब : तालुक्यातील पहूरजिरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी कृत्य करत एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये चोरी करून तब्बल ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील पहूरजिरा ता. शेगाव येथे दोन अज्ञात चोरट्यांनी संगनमताने गावात प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम सिताराम नारायण कोंडे (वय ७०) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्या वेळी घरात असलेल्या कोंडे व त्यांच्या पत्नीला धमकावत कपाटातील ३० हजार रुपये रोख रक्कम तसेच पत्नीच्या अंगावरील चांदीच्या पाटल्या किंमत सुमारे २०... - [दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारा १ ठार; १ जखमी](https://vidharbhlive.com/hsishlsnssvk/): जलंब : जलंब-माटरगाव मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन इसमांना भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना १० एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास निंबी गावाजवळ घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माटरगाव (ता. शेगाव) येथील रहिवासी शालिग्राम लाड आणि जानू भुतडा हे दोघेही सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते जलंब-माटरगाव मार्गावरून चालत असताना खामगावकडून येणाऱ्या एका भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले.... - [वीज तारा चोरीचा प्रकार; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना](https://vidharbhlive.com/nan-9/): नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात वीज तारा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ ते ८ एप्रिलदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोजने रोहित्र परिसरातील सहा गाळ्यांमधून तीन फेज, चार वायर प्रणालीतील सुमारे १२०० मीटर लांबीची वीज तार चोरीला गेली आहे. या प्रकारामुळे वीजपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी वडनेर भोलजी येथील महावितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे (वय ३८) यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस... - [ढाब्यावर ट्रकचालकावर हल्ला; साखळी व रोख रक्कम लंपास! मलकापूरातील तिघांवर नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/hskehoevowg/): नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एका ढाब्यावर जेवण करत असलेल्या ट्रकचालकावर तिघांनी हल्ला करून त्याच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान फिरोज खान (वय ३४, रा. सुरत, गुजरात) हे ट्रकचालक ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा आपल्या मित्रासह ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपींनी विनाकारण वाद घालत त्यांच्याशी शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी त्यांच्या खिशातील सुमारे १५ हजार रुपये रोख रक्कम तसेच गळ्यातील अंदाजे २ तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. या घटनेत एकूण सुमारे १ लाख १५ हजार... - [खोरेश्वर परिसरातील वॉटर पार्कमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू; निष्काळजीपणाचा संशय](https://vidharbhlive.com/hdohrpsnb/): देऊळगाव राजा : शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये पाण्यात बुडाल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (९ एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मृत तरुणाचे नाव शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे आहे. तो संभाजीनगर येथे खासगी कंपनीत नोकरी करत होता. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तो देऊळगाव राजा येथे आला होता. या दरम्यान मित्रांसोबत फिरण्यासाठी तो वॉटर पार्कमध्ये गेला होता. माहितीनुसार, वॉटर पार्कमधील पाण्यात खेळत असताना शुभम अचानक खोल भागात गेला आणि पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी... - [शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास सिंगल फेज वीज द्या - संभाजी शिर्के यांची मागणी](https://vidharbhlive.com/jsosjslsv/): मलकापूर : दाताळा एमएसईबी अंतर्गत येणाऱ्या वरखेड, सावडी, भाडगणी व लासुरा शिवारातील शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज मलकापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे यांना निवेदन सादर केले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सिंगल फेज वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून अंधारामुळे जनावरे तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा... - [चांडक विद्यालयात विद्यादेवतेचा जागर; सरस्वती पूजन उत्साहात](https://vidharbhlive.com/hsogalsjsl/): मलकापूर : स्थानिक लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात सामूहिक सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कला व गुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते विजय अंबुसकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या सौ. काळपांडे मॅडम, उपमुख्याध्यापक निंबोळे सर तसेच पर्यवेक्षक तोमर सर उपस्थित होते. प्रमुख वक्ते अंबुसकर पुढे म्हणाले की, भारत हा अध्यात्माची जननी असून भारतीय संस्कृती ही रूढी, परंपरा व धर्मावर आधारलेली आहे. त्यातूनच विविध उत्सवांच्या माध्यमातून आपण पूजा-अर्चा करतो. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मनःशांती आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी विद्येची... - [ डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे पूल कॅम्पस ड्राइव्हमध्ये 32 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड](https://vidharbhlive.com/mlk-160/): मलकापूर :- इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था (IBSS) संचलित संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव अढाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूल कॅम्पस आयोजित करण्यात आला होता. भरतीमध्ये 32 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली. ही भरती मोहीम डॉ राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे One Asia Network India Pvt. Ltd., खामगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची... - [एसटी स्थानकावर अल्पवयीन मुलीची छेडछाड; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/jdltvkslav/): शेगाव : शहरातील एसटी बस स्थानकावर गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही शेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती ७ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे शेगाव शहरातील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आली होती. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसह एसटी बस स्थानकावर गावी जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करत उभी होती. त्यावेळी त्याच गावातील ओळखीचा असलेला पवन पंजाबराव इंगळे हा तेथे आला. फिर्यादीनुसार, त्याने मुलीची छेड काढत तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात... - [कारच्या धडकेत ऑटो उलटून; दुचाकी चिरडली, सुदैवाने जीवितहानी टळली](https://vidharbhlive.com/psutpsjo/): खामगाव : शहरातील टिळक पुतळा परिसरात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो उलटून जवळून जाणारी दुचाकी ऑटोखाली चिरडली गेल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या संतोष मधुकर काकड (रा. गोंधनापूर) याने कारवरील नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्या गजानन देशमुख यांच्या ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो जागीच उलटला. त्याचवेळी जवळून जात असलेली एक दुचाकी ऑटोखाली दबली गेली. अपघात होताच परिसरात... - [गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांवर हल्ला; एक आरोपी स्वतः पोलिस शिपाई](https://vidharbhlive.com/haogdlasvk/): संग्रामपूर : कवठळ रस्त्यावर रात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना ५ एप्रिलच्या मध्यरात्री उशिरा घडली. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एक आरोपी सध्या अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष तुळशीराम आखरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मुळे हे पेट्रोलिंग वाहनासह रात्री गस्तीवर होते. दरम्यान कवठळ शिवारात गुप्तधन शोधणारी टोळी आल्याची माहिती त्यांना मोबाईलवरून मिळाली. त्यानुसार दोन्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले; मात्र तेथे कोणीही आढळून आले नाही. यानंतर परत येत असताना... - [मलकापुरात डासांचा कहर वाढला; नागरिक त्रस्त, धूर फवारणीची जोरदार मागणी!](https://vidharbhlive.com/mlk-159/): मलकापूर :- शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील गल्लोगल्ली डासांचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेकडून डास नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः धूर फवारणी होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याचेही समोर आले आहे. परिस्थिती लक्षात घेता, शहरातील सर्व भागात तातडीने धूर फवारणी करण्यात यावी तसेच स्वच्छता मोहिम राबवून डासांची उत्पत्ती रोखावी, अशी... - [शेतकऱ्याच्या मुलाची MPSC मध्ये झेप; पवन नेमाडेची कर सहायक पदावर निवड](https://vidharbhlive.com/bsijorvlwkmpsc/): मोताळा : अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पवन कैलास नेमाडे यांनी प्रचंड संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा २०२४ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. OBC प्रवर्गातून राज्यात चौथा क्रमांक मिळवत त्यांनी कर सहायक (Tax Assistant) पदावर निवड मिळवली आहे. शेतकरी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत पवन यांनी गावासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. लिहा येथील साध्या आणि अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात पवन नेमाडे यांचे बालपण गेले. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही शिक्षणाची जिद्द त्यांनी कधीही सोडली नाही. लॉकडाऊनच्या काळापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मर्यादित साधने, आर्थिक अडचणी आणि अनेक संकटांचा सामना करत त्यांनी... - [मलकापूरातील नकली नोट प्रकरणी आरोपीचे सिडीआर - एसडीआर तपासल्या नंतर खाकी' तिल गद्दार समोर येणाची शक्यता; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी](https://vidharbhlive.com/ndoysksbaoag/): मलकापूर : मलकापूर शहरात नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या कारवाईसाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक मलकापूरात येऊन सापळा रचते आणि आरोपींना रंगेहात पकडते, ही बाबच शहरातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे मलकापूर शहर पोलीस नेमके काय करत होते? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मलकापूर शहरात मागील काही काळापासून नकली नोटांची देवाणघेवाण, लोकांना आमिष दाखवून फसवणूक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट नोटांची सौदेबाजी अशा घटना अधूनमधून समोर येत आहेत. त्यामुळे ही बाब आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलिसांना याची माहिती... - [मलकापूरात नकली नोटांचे रॅकेट उध्वस्त; ९ लाखांच्या बनावट नोटांसह चौघे जेरबंद, पोलिसांशी झटापटीत पीएसआय जखमी; एक आरोप फरार; ‘खाकी’तील 4 ते 5 जणांचा छुप्या पाठिंब्याची शहरात चर्चा](https://vidharbhlive.com/bsjozhalrk/): मलकापूर : मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या नकली नोटांच्या रॅकेटवर अखेर पोलिसांनी मोठा घाव घालत धाडसी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी (दि. ६ एप्रिल) दुपारी सुमारे तीन वाजता बसस्थानकाजवळील स्वराज बेकरी परिसरात सापळा रचून चार आरोपींना तब्बल ९ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह रंगेहात अटक केली. आरोपींनी पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांशी झटापट केली असून या झटापटीत पीएसआय अविनाश जायभाये यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणातील एक आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. मलकापूर आणि परिसरात नकली नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एलसीबीने अत्यंत काटेकोरपणे सापळा रचला. आरोपी... - [३३५ स्प्रिंकलर तोट्या, मोटरपंप व केबल लंपास; शेतकऱ्यांचे ९० हजारांचे नुकसान](https://vidharbhlive.com/lonar-4/):   लोणार :- हिरडव, दाभा व जाफ्राबाद शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३३५ स्प्रिंकलरच्या तोट्या, मोटरपंप व केबल चोरी करून सुमारे ९० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. माहितीनुसार, परिसरातील सुमारे १८ ते २० शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व मूग पिकासाठी ३ एप्रिल रोजी सायंकाळी स्प्रिंकलर सुरू केले होते. हवामान खराब असल्याने शेतकरी पाहणी करून घरी परतले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शेतातून ३३५ स्प्रिंकलर तोट्या, ५ एचपी समर्सिबल मोटरपंप व ३०० फूट केबल चोरी केली. शनिवारी सकाळी पोलीस पाटील रमेश तानाजी ओव्हर हे शेतात पाहणीसाठी गेले असता स्प्रिंकलरच्या... - [२ लाखांचा गांजा जप्त; २१ वर्षीय युवक जेरबंद, मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिसांची कारवाई](https://vidharbhlive.com/mtl-15/): मोताळा : – अमली पदार्थांविरोधातील कारवाईत बोराखेडी पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास दोन लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून एका २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४ वाजता करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी पोलिसांना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) परिसरातील कॉटन मार्केट भागात अजय रोहिदास मोहिते (वय २१) हा गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली. धाडीदरम्यान पोलिसांनी अजय मोहिते याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून १ लाख ९६ हजार रुपये किमतीचा ९ किलो ८०० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात... - [‘तू मला आधी जेलमध्ये का टाकल' असे म्हणत महिलेच्या घरात घुसून मारहाण व विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा](https://vidharbhlive.com/deu/): देऊळगाव राजा :- तालुक्यातील देऊळगाव मही येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून तिच्यावर मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकर उत्तम खिल्लारे (रा. देऊळगाव मही) याच्याविरुद्ध कायम अप नं. १३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी महिला घरात झोपलेली असताना दरवाजावर आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपी दारात... - [विद्युत पोलवरील साहित्य चोरीचा प्रयत्न फसला ; एकास अटक, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त! मलकापूरची घटना](https://vidharbhlive.com/mlk-158/):   मलकापूर : महामार्गावरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळील पुलावर उभारलेल्या विद्युत पोलवरील तार कटिंग करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईत सुमारे २१ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत परसराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ४ एप्रिल रोजी मुंदडा पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या पुलावर काही इसम विद्युत पोलवरील तार कटिंग करून चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेण्यात आली. दरम्यान, संशयितांनी आपल्या ताब्यातील दोन दुचाकी... - [बस डेपोमध्ये चालकास मारहाण; स्वच्छक कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/toavffvksbk/): शेगाव : शहरातील बस डेपो परिसरात बस चालकाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एका स्वच्छक कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन गणेशराव सनगाळे (वय ३९, व्यवसाय बस चालक, शेगाव आगार) हे ३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अडसना रोडवरील बस डेपोतील वाहन परीक्षक कक्षात बसले होते. त्यावेळी प्रमोद गणपत पोहरे (रा. रोकडीयानगर, शेगाव) हा स्वच्छक कर्मचारी तेथे आला व त्याने फिर्यादीला उद्देशून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्याला शिवीगाळ करू नये तसेच त्या ठिकाणी त्याचे काही काम नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या आरोपीने फिर्यादीला ढकलून देत... - [गोठ्यावर टिन पत्रे दुरुस्त करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू](https://vidharbhlive.com/lhorckdgc/): दुसरबीड (सिं.राजा) : तालुक्यातील खैरखेड येथे घरासमोरील गुरांच्या गोठ्यावर टिन पत्रे दुरुस्त करत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ मार्च रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खैरखेड येथील अरविंद गंगाधर वाघ (वय २७) हा आपल्या घरासमोरील गुरांच्या गोठ्यावर टिन पत्रे दुरुस्त करण्याचे काम करत होता. त्यावेळी घराच्या अगदी जवळून गेलेल्या विद्युत वाहिनीमुळे टिन पत्र्याचा झोक थेट विद्युत तारेवर गेला. त्यामुळे अरविंद वाघ यांना जोरदार विजेचा शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही विद्युत वाहिनी घराच्या... - [झोपेत विषारी सापाने दंश केल्याने 19 वर्षीय युवतीचा मृत्यू, लोणार तालुक्यातील घटना!](https://vidharbhlive.com/lonar-3/): लोणार : तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने १९ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव कुंडपाळ येथील रवींद्र शेषराव सानप यांची १९ वर्षीय मुलगी कु. साक्षी सानप ही शुक्रवारी रात्री आई-वडिलांसोबत घरात झोपलेली होती. यावेळी झोपेत असताना तिला विषारी सापाने दंश केला. सकाळी उठल्यानंतर तिच्या घशात दुखत असल्याची तसेच अॅसिडिटीसारखा त्रास होत असल्याची तक्रार तिने कुटुंबीयांना सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ तिला लोणार येथील दवाखान्यात दाखल केले. लोणार येथे उपचार सुरू असताना प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. दरम्यान... - [घरात घुसून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/vahsossnlv/): देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथे एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घरात असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपीने घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर महिलेचा हात धरून तिला घराबाहेर ओढत नेले व तिचा विनयभंग केला. तसेच या घटनेदरम्यान आरोपीने महिलेच्या तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेच्या मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक घटनास्थळी धावून आले. परिसरातील लोक जमा होत असल्याचे पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर... - [रेल्वेसमोर उडी घेऊन अज्ञात वृद्ध इसमाची आत्महत्या; बिस्वा ब्रिज - मलकापूर ची घटना](https://vidharbhlive.com/hsoshslv-3/): मलकापूर : बिस्वा ब्रिज ते मलकापूर रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर एका अज्ञात वृद्ध इसमाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत ट्रॅकमॅन निलेश राजाराम ढोले (युनिट क्र. १, वडोदा स्टेशन) यांनी दिलेल्या मेमोवरून ही नोंद करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.५० वाजण्यापूर्वी बिस्वा ब्रिज ते मलकापूर स्टेशन दरम्यान अप लाईनवर एका अज्ञात व्यक्तीने गाडी क्र. MFSG समोर उडी घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात उप स्टेशन प्रबंधक कार्यालय, मलकापूर येथून मिळालेल्या मेमोच्या... - [जागा व पैशांच्या वादातून लोंबाझोंबी; ५ जणांसह ७ ते ८ जणांवर गुन्हा; मलकापूरच्या चाळीस बिघा परिसरातील घटना](https://vidharbhlive.com/hsuizzjlv/): मलकापूर : जागा व पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये ओढाताण व लोंबाझोंबी झाल्याची घटना शहरातील भ्रातृमंडळ चाळीसबिघा परिसरात घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पाच जणांसह इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष दिलीप पेंढारकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास भ्रातृमंडळ चाळीसबिघा परिसरात जागा व पैशांच्या वादावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी एकमेकांशी ओढाताण करीत लोंबाझोंबी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी मनोहर किणगे (वय ६०), सतीष राजपूत (वय ५८), दिग्वीजयसिंग राजपूत (वय २६), अमोल राजपूत (वय ३५) सर्व रा. दाताळा तसेच अतुल किणगे... - [‘तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत… चल आपण शेगावला एन्जॉय करू, म्हणत महिलेचा विनयभंग; आरोपी गजाआड](https://vidharbhlive.com/bzjuzzpv/): शेगाव : पतीसोबत उपचारासाठी आलेल्या महिलेचा रस्त्यात अश्लील प्रस्ताव देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. ‘तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत… चल आपण शेगावला एन्जॉय करू’ असे म्हणत आरोपीने महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. १ एप्रिल रोजी ती आपल्या पतीसह शेगाव येथे उपचारासाठी आली होती. उपचार आटोपल्यानंतर दोघेही घरी परतत असताना महिला मित्राच्या मोटारसायकलवरून पुढे निघाली. मात्र मोटारसायकलची चावी पतीकडे राहिल्यामुळे ती गावाजवळील... - [आमदाराचे नाव सांगत दादागिरी; आई-बहिणीसह तरुणाला मारहाण तीन आरोपींवर अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/hshsosvsmv/): अंढेरा : राजकीय नेत्यांचे नाव सांगून सर्वसामान्यांवर दादागिरी करण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुरा येथे एका तरुणाला त्याची आई व बहीण सोबत असताना मोटारसायकल आडवी लावून मारहाण केल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरा येथील रहिवासी अक्षय रामचंद्र साळवे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते त्यांच्या आई व बहिणीसह मोटारसायकलवरून फाट्याकडे जात असताना तीन आरोपी त्यांच्या जवळ आले व मोटारसायकल आडवी लावून त्यांचा रस्ता अडवला. फिर्यादीने “गाडी का आडवी लावली?”... - [वीजपुरवठा विस्कळीत; घिर्णी-बेलाड ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू](https://vidharbhlive.com/mlk-157/): मलकापूर :- तालुक्यातील घिर्णी व बेलाड गावांमध्ये सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, वसंता बाबुराव चित्रंग यांच्या नेतृत्वाखाली बेलाड उपकेंद्रासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरापासून सिंगल फेज लाईन दररोज दीर्घकाळ बंद राहत असून, थ्री फेज वीजपुरवठाही नियमित नसल्याने शेती, घरगुती कामे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः शेतीसाठी पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने पिकांचे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच थ्री फेज लाईनवरील तारा जास्त भारामुळे वारंवार ट्रिप होत असल्याने वीजपुरवठा अधिकच विस्कळीत होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परीक्षांचा काळ सुरू असताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी... - [१० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; गावठाण फेर रद्द करण्यासाठी मागितले होते ३० हजार; खामगाव पंचायत समितीत रंगेहात कारवाई](https://vidharbhlive.com/hhsisgsskc/): बुलढाणा : गावठाण जमिनीच्या नोंदीत फेरफार करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील ग्रामसेवकाला बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवार, २ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गारडगाव (ता. खामगाव) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय माधव गवई यांनी तक्रारदार शेतकऱ्याच्या गावाबाहेरील गावठाण शेतातील जागेची नमुना ८-अ नोंद रद्द करून दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीबाबत संबंधित शेतकऱ्याने बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीने २५ मार्च रोजी पडताळणी कार्यवाही केली असता, ग्रामसेवक विजय गवई यांनी नमुना... - [२४ तासांत पोलिसांची चपळ कारवाई; फरार आरोपीसह ३.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत](https://vidharbhlive.com/nsksupfbv/): खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत फरार आरोपीला अटक करून चोरीतील सुमारे ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२, रा. खामगाव) यांनी १ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीच्या हॉटेल व लॉजिंगमध्ये आरोपी सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३०, रा. अमृतनगर, सजनपुरी, खामगाव) याने नोकरीच्या बहाण्याने प्रवेश मिळवला. त्यानंतर काउंटरमधून रोकड व इतर साहित्य चोरून तो पसार झाला होता. या चोरीमध्ये २० हजार रुपये रोकड, एचपी कंपनीचा लॅपटॉप (किंमत सुमारे ३५ हजार रुपये) तसेच... - [देशी बनावटीच्या पिस्तुलासह तिघे जेरबंद; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त](https://vidharbhlive.com/hdksosvrb/): बुलडाणा : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जामोद परिसरात मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे व मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद परिसरात काही इसम अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांवर नजर ठेवली. योग्य वेळी कारवाई करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन इंदरसिंग डावर (वय २३, रा. राजूर बु.),... - [सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; जळगांव जामोद येथील घटना](https://vidharbhlive.com/jlg-2/): जळगांव जामोद : सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या सुनगाव वेस भागातील एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनगाव वेस येथील शेतकरी गोपाल लक्ष्मण भड (वय ५१) यांनी १ एप्रिल रोजी स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असतानाच २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे २... - [‘माझी मराठी शाळा, माझा अभिमान’ पथनाट्याद्वारे शैक्षणिक जनजागृती; भालेगाव रण येथे विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://vidharbhlive.com/ksksksjskv/): मलकापूर :- जिल्हा परिषद मराठी शाळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि शाळेची पटसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भालेगाव रण (केंद्र धरणगाव, पंचायत समिती मलकापूर) येथील विद्यार्थ्यांनी गावात सुरू असलेल्या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने ‘माझी मराठी शाळा, माझा अभिमान’ या पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करून शैक्षणिक जनजागृती केली. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच गटशिक्षणाधिकारी फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे आणि केंद्रप्रमुख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पथनाट्याच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद मराठी शाळांचे महत्त्व, शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली शाळेची भूमिका याबाबत ग्रामस्थांना रंजक पद्धतीने माहिती देण्यात आली. इयत्ता पहिली ते... - [शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरी! नांदुरा तालुक्यातील घटना](https://vidharbhlive.com/mlk-156/):   नांदुरा :- तालुक्यातील पिंप्री कोळी शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धाडसी चोरी करत सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव नेहू येथील शेतकरी सुपडा बोरसे (वय ५५) हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता मोटार सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता मोटारीची केबल कापून ७.५ हॉर्सपॉवरची मोटार चोरीला गेल्याचे उघड झाले. या घटनेनंतर परिसरातील इतर शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता, कैलास सुलताने, देवानंद रावणचवरे, भागवत बावस्कार, वासुदेव जानवरसे आणि अर्जुन या शेतकऱ्यांच्या मोटारीही चोरीला गेल्याचे समोर आले. चोरट्यांनी एकाच वेळी... - [नगरपालिकेने 'अभय योजना' लागू करावी; अन्यथा तीव्र आंदोलन - चेतन अप्पा जगताप यांचा इशारा](https://vidharbhlive.com/jaksispvfi/): मालकापूर: शहरातील सामान्य नागरिकांवरील मालमत्ता कराचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आणि नगरपालिकेची थकीत वसुली पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ‘अभय योजना’ (Amnesty Scheme) लागू करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन अप्पा जगताप यांनी केली आहे. दंडामुळे नागरिक हतबल शहरातील अनेक भागांत गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे. मात्र, या करावर लागणारे व्याज आणि दंडाची (शास्ती) रक्कम मूळ करापेक्षाही जास्त झाली आहे. “नागरिकांना कर भरण्याची इच्छा आहे, पण वाढीव दंडामुळे त्यांना ते शक्य होत नाहीये. प्रशासनाने हा दंड माफ केल्यास नागरिक उत्स्फूर्तपणे कर भरतील,” असे मत चेतन अप्पा जगताप यांनी व्यक्त केले. विकासकामांसाठी निधीची गरज शहरात सध्या दूषित पाणीपुरवठा,... - [भरधाव दुचाकीची मागून धडक; दोघे जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा; मलकापूरातील घटना](https://vidharbhlive.com/jajsjsl/): मलकापूर : शहरातील बुलढाणा रोड परिसरात रात्रीच्या वेळी भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीने मागून धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैभव राजेंद्र वाशीमकर (रा. वृंदावन नगर, मोताळा, ह.मु. माता महाकाली नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २९ मार्च रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता ते आपल्या साला भुषण संतोष बानाइत याच्यासोबत मोटारसायकल क्र. एमएच २८ सीबी १०१३ ने बुलढाणा रोडवरून बसस्थानकाच्या दिशेने जात होते. दरम्यान, तुलसी ज्वेलर्स समोर अचानक मागून आलेल्या अज्ञात मोटारसायकल चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवित त्यांच्या... - [शेतात आंब्याच्या झाडाला गळफास; ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या](https://vidharbhlive.com/jsjsosh/): सुनगाव (ता. जळगाव जामोद) : तालुक्यातील सुनगाव येथे एका ३६ वर्षीय तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण प्रल्हाद दामधर (वय ३६, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी २९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास कौलखेड शिवारातील स्वतःच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतकाचा भाऊ संतोष प्रल्हाद दामधर (वय ४०) यांनी या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस... - [“आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुला खलास करून टाकू,” तिघांकडून काठीने मारहाण, मलकापूर तालुक्यातील घटना](https://vidharbhlive.com/bsjsososp/): मलकापूर : घरासमोर येऊन शिविगाळ करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीवर काठीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना वडजी येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राम गुलाब सोनोने (रा. वडजी, ता. मलकापूर) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या घराजवळ राहणारे सोपान लक्ष्मण सोनोने, सागर लक्ष्मण सोनोने व लक्ष्मण शेनु सोनोने (सर्व रा. वडजी) हे घरासमोर येऊन वारंवार शिविगाळ करत होते. यावेळी राम सोनोने यांनी त्यांना शिविगाळ करू नका असे सांगितले. मात्र याचा राग आल्याने आरोपींनी हातातील काठीने त्यांच्यावर मारहाण केली.... - [अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू; उदयनगर परिसरातील घटना](https://vidharbhlive.com/nskshslb/): उदयनगर : उदयनगर – हरणी मार्गावरील बेलासरी शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (३० मार्च) रात्री ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उदयनगरपासून काही अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर असल्यामुळे येथे बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांची वर्दळ नेहमीच पाहायला मिळते. हरणी, वैरागड, उदयनगर तसेच किन्ही सवडत परिसरात शेतात काम करताना शेतकऱ्यांना अनेकदा या प्राण्यांचे दर्शन होते. गेल्या काही वर्षांत या भागात अस्वल व बिबट्यांची संख्या वाढल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. अशातच रविवारी रात्री रस्ता ओलांडत असताना एका अस्वलाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची शक्यता... - [वायर जोडतांना विद्युत धक्क्याने तरुणाचा मृत्यू; देऊळगाव मही येथील घटना](https://vidharbhlive.com/bsjishalb/): देऊळगाव राजा :देऊळगाव मही येथे इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडताना विद्युत धक्का लागून ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.३० मार्च) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून बनसोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही येथील रहिवासी गणेश आश्रुबा बनसोडे (वय ३७) हे आपल्या घरात वापरात असलेल्या इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडत होते. सध्या घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक नागरिक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत आहेत. त्याचदरम्यान वायर जोडताना अचानक त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला. या घटनेत गणेश बनसोडे हे गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र... - [आगेमोहळच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू](https://vidharbhlive.com/hsjaozsbl/): रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथे शेतात काम करत असताना आगेमोहळच्या मदमाशांनी अचानक हल्ला चढवल्याने एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ३१ मार्च रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सुरोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेड भट येथील शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास अचानक पुढे असलेल्या झाडांजवळील आगेमोहळच्या पोळ्यातून मोठ्या संख्येने मदमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी सुरोशे यांच्यावर हल्ला चढविला. मदमाशांनी शरीरावर अनेक ठिकाणी दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र मदमाशांच्या तीव्र... - [खामगावातील ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांचा छापा; कॅबिनमध्ये ३ जोडपी आढळली](https://vidharbhlive.com/khm-22/): खामगाव :- शहरातील शेगाव रोड परिसरातील ‘फूड स्टोरी’ कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान कॅफेमध्ये तीन जोडपी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. शहरातील शेगाव रोड परिसरात असलेल्या ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांनी छापा टाकत संशयास्पद हालचालींवर कारवाई केली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतात बसण्यासाठी स्वतंत्र कॅबिन्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कॅबिन्ससाठी प्रति तास सुमारे २०० रुपये आकारले जात असल्याचेही समोर... - [वादळी वाऱ्यासह गारपीट; मलकापूर-मोताळा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान](https://vidharbhlive.com/mlkmtl-2/): मलकापूर :- मलकापूर व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसासोबत गारांचा मारा झाल्याने मका, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके वादळ आणि गारांच्या तडाख्याने आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच विविध अडचणींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या अवकाळी... - [चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूतील घटना](https://vidharbhlive.com/jskossb/): मलकापूर : चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विजय भावराव तायडे (वय २५) रा. काळेगाव ता. मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस संपल्यामुळे त्यांनी घराजवळ चुल पेटवून स्वयंपाक सुरू केला होता. यावेळी चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याचे सांगत शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींनी त्यांना जाब विचारला. यातून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण होऊन तो पुढे वाढत गेला. तक्रारीनुसार आरोपी विजय शंकर दाभाळे, अजय शंकर दाभाळे, अविनाश शंकर दाभाळे आणि... - [फर्निचर दुकान फोडून ९७ हजारांचा माल लंपास](https://vidharbhlive.com/nsjsisjsob/): मेहकर : शहरालगतच्या चिखली रोडवरील चायगाव फाट्याजवळील मेहकर भाग-२ परिसरात अज्ञात चोरट्यांनी फर्निचर दुकानाचे शटर तोडून सुमारे ९७ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी कैलास प्रकाश गाडे (वय ३६, रा. कल्याणा ता. मेहकर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या चायगाव फाट्याजवळील शेतजमिनीवर ‘श्रेया फर्निचर’ नावाचे दुकान असून येथे सागवान लाकडापासून विविध फर्निचर तयार करून विक्री केली जाते. २९ मार्च रोजी सायंकाळी दुकान बंद करून कर्मचारी घरी गेले होते. मात्र ३० मार्च रोजी सकाळी गाडे दुकानात आले असता... - [शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; अडीच एकर मका जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान](https://vidharbhlive.com/hsisjzslsv/): जळगाव जामोद : कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर जळताना पाहण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर आली. ततारपूर शेतशिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कापणीसाठी तयार असलेला अडीच एकर मका जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना २८ मार्च रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली. या आगीत पीकासह शेतीपयोगी साहित्यही भस्मसात झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद शहरालगत असलेल्या ततारपूर शेत शिवारात शेतकरी शकुंतलाबाई लक्ष्मण बनकर यांच्या शेतात कापणीसाठी तयार असलेला मका उभा होता. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण अडीच एकर क्षेत्रातील मका जळून खाक झाला. शेतकरी व ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न... - [खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल विक्री; चिखलीतील पेट्रोलपंप मालकावर गुन्हा](https://vidharbhlive.com/haiozmzlv/): चिखली : प्रशासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करून कॅन व बाटल्यांमध्ये इंधन विक्री केल्याप्रकरणी चिखली येथील एका पेट्रोलपंप मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत राहावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पेट्रोलपंपांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी विशेष आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच देणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, चिखली येथील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर २६ मार्च २०२६ रोजी खुल्या... - [किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा](https://vidharbhlive.com/bsjshslsb/): शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हिंसक वळण घेत एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास शेतातून घरी परतत असताना जयअंबे नगर परिसरात आरोपी प्रकाश मेतकर याने त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. वाद वाढताच संतापलेल्या प्रकाश मेतकर याने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात म्हस्के जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी आरोपीची आई... - [विषप्राशनामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; देवधाबा येथील घटना](https://vidharbhlive.com/jsjsislb/): मलकापूर : देवधाबा येथील एका २५ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सुनील कावळकर (वय २५, रा. देवधाबा) या तरुणाने २३ मार्चच्या सुमारास अज्ञात कारणावरून विष प्राशन केले होते. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने नातेवाईक शिवाजी शांताराम कावळकर यांनी त्याला तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय... - [अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा](https://vidharbhlive.com/aossjob/): आसलगाव : तालुक्यातील वडगाव पाटण येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात एका वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथील अल्पवयीन मुलगी घरात खुर्चीवर बसून दूरदर्शन पाहत असताना गावातील सुरेश शालिग्राम वावगे (वय ६०) हा तिच्या जवळ येऊन अयोग्य प्रकारे छेडछाड करू लागला. अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीला लाथ मारून तेथून पळ काढला. यानंतरही आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग करत तिच्या शाळेजवळ जाऊन तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर... - [धांदरवाडीत मध्यरात्री घरफोड्या; दोन घरे व किराणा दुकान फोडून ऐवज लंपास!](https://vidharbhlive.com/crime-18/): सिंदखेडराजा : – तालुक्यातील धांदरवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे आणि एका किराणा दुकानावर हात साफ करत सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील कैलास केंधळे यांच्या घरी नुकताच लग्नसोहळा पार पडला होता. लग्नानंतर कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त करत त्यांनी मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. यानंतर चोरट्यांनी शेजारील एका किराणा दुकानातही प्रवेश केला. दुकानात रोख रक्कम न मिळाल्याने त्यांनी दुकानातील सुमारे 12 किलो काजू लंपास केले.... - [अज्ञात वाहनाच्या धडकेत महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू!](https://vidharbhlive.com/accident-14/):   देऊळगाव राजा :- जालना रोड बायपास परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने महावितरणमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. निकेत सुरेश मिनासे (वय 42, रा. बालाजी मंदिराजवळ, देऊळगाव राजा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास मिनासे हे दुचाकीने जालना रोडवरून देऊळगाव राजा शहराच्या दिशेने येत होते. दरम्यान, बायपासवरील एका वाईन बारजवळील परिसरात पाठीमागून वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मिनासे यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत... - [व्याजाच्या पैशाची वसुली करण्यासाठी जिवे मारण्याची व मुलाचे अपहरण करणार्‍यांवर कारवाई करा- भाजपा युवानेते अरविंद किनगे यांची पो.स्टे.ला तक्रार](https://vidharbhlive.com/hskshzslsv/): मलकापूर : व्याजाने घेतलेले पैसे मागण्यासाठी जिवे मारण्याची व मुलाचे अपहरण करण्याची धमकीची तक्रार भाजपाचे युवानेते अरविंद मनोहर किनगे रा.मलकापूर यांनी मलकापूर शहर पो.स्टे.ला २४ फेब्रुवारी रोजी दिली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, मी गणेश वैतकार रा.कुंड, ह.मु. वरणगाव व सचिन पाचपोळ रा.धरणगाव यांचेकडून २ टक्के दराने व्याजाने ११ लाख रूपये जानेवारी २०२६ मध्ये आर्थिक अडचण आल्यामुळे घेतले होते. मला वेगवेगळ्या तारखेस आरटीजीएस व फोन पे द्वारा माझ्या खात्यात व माझ्या पत्नीच्या खात्यात मला पाठविले होते. त्यावेळी त्यांनी मला २ टक्के दराने व्याज देण्याबाबत ठरविले होते. परंतु आता मला तो म्हणाला की, मला आता मासिक १५ टक्के दराने व्याज... - [पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेची सोन्याची पोत लंपास; पोलिसांनी आरोपी महिलेला अटक](https://vidharbhlive.com/jakajsksv/): मोताळा ( बोराखेडी ):- पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल असलेली पोत चोरून नेणाऱ्या एका महिलेला बोराखेडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 मार्च 2026 रोजी वरुण ओंकार असोलकर (रा. मोताळा) यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या बहिणी सुजाता या त्यांच्या मैत्रिणीसोबत घराच्या ओट्यावर बसलेल्या असताना एक अनोळखी महिला तेथे आली. तिने स्वतःला खरबडी गावची असल्याचे सांगत रस्ता चुकल्याचे सांगितले आणि पिण्यासाठी पाणी मागितले. दरम्यान, त्यापैकी एक महिला पाणी आणण्यासाठी घरात गेली असताना त्या अनोळखी महिलेने संधी... - [स्व. ॲड. महादेवसिंह रावळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मशानभूमीत ८४ वृक्षांची लागवड](https://vidharbhlive.com/mlk-155/): मलकापूर :- माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांचे वडील तथा धुपेश्वर संस्थानचे अध्यक्ष आणि मलकापूर जिल्हा सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ स्व. ॲड. महादेवसिंह चंद्रसिंह रावळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ माता महाकाली नगर येथील स्व. लक्ष्मण हिरु चव्हाण वैकुंठधाम परिसरात 84 वृक्षांची लागवड करण्यात आली. स्व. ॲड. महादेवसिंह रावळ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यानंतर 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठधाम येथे रक्षा सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल गांधी,... - [मलकापूरातील बिर्ला रोडवरून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!](https://vidharbhlive.com/mlk-154/): मलकापूर : – शहरातील बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटल परिसरातून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरणखेड (ता. मलकापूर) येथील रहिवासी तसेच कृषी केंद्र चालक अरविंद अशोक खाचणे (वय 37) यांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी बजाज प्लॅटीना (क्रमांक एमएच-28-बीएफ-1820) ही दुचाकी घेतली होती. 8 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता ते घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी मलकापूर शहरातील बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटलजवळ आले होते. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून बाजारात खरेदीसाठी गेले. काही वेळाने परत आले असता दुचाकी उभी केलेल्या... - [हरिओम वधु वर मेळाव्याचे दिवंगत अध्यक्ष स्व. किरण दुसाने यांना विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे जाहीर करण्यात आलेल्या कृति आराखडा संदर्भात सोनारवाडा, नाशिक येथील सहविचार बैठक समर्पित](https://vidharbhlive.com/nashik/): नाशिक : – येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात अर्थात सोनारवाड्या मध्ये मंगळवार, दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता *सकल भारतीय सोनार समाज संघटन* या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे तसेच सोनार समाजाच्या विविध समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून कशी करता येईल, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठातर्फे विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कृति आराखड्या संदर्भात सहविचार बैठक पार पडली. नाशिक येथील हरिओम सांस्कृतिक संस्था वधु वर परिचय मेळाव्याचे दिवंगत अध्यक्ष स्व. श्री. किरण जगन्नाथ दुसाने प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केले. सदर सहविचार बैठक ही... - [बेंजो केमिकल कंपनीत विजेचा धक्का; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू](https://vidharbhlive.com/mlk-153/): मलकापूर :- दसरखेड परिसरातील बेंजो केमिकल कंपनीच्या आवारात काम करत असताना विजेचा धक्का लागून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील वाघुडा येथील अर्जुन शंकर सरदार (वय 18) हा युवक बेंजो केमिकल कंपनीत कंत्राटदारामार्फत ठेकेदारी पद्धतीने बांधकामाचे काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास काम आटोपल्यानंतर अर्जुन हातपाय धुण्यासाठी उभा असताना जवळच असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला त्याचा हात लागला. यावेळी अचानक जोराचा विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. घटनेनंतर सहकारी कामगार व नागरिकांनी तातडीने अर्जुनला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत... - [रेल्वे रुळ ओलांडताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मलकापूरची घटना!](https://vidharbhlive.com/mlk-152/):   मलकापूर :- रेल्वे रुळ ओलांडताना इंजिनची धडक बसून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 12) सकाळी मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 6.20 वाजताच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर एका महिलेचा अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मृत महिलेची ओळख सुनीता रवी महाले (वय 38) अशी पटली. त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मूळ रहिवासी असून सध्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिलेचा मुलगा आदित्य रवी महाले (वय 17) याने... - [सर्प पकडताना वयोवृद्ध सर्पमित्राचा मृत्यू; इतरांच्या सुरक्षिततेसाठी धावणारा धाडसी जीव अखेर सर्पदंशाला बळी; मलकापूरात हळहळ](https://vidharbhlive.com/jsosksosv/): मलकापूर : शहरातील नागरिकांना सर्पांच्या भीतीतून मुक्त करून सुरक्षित झोप मिळावी म्हणून अनेक वर्षे जीव धोक्यात घालून सेवा करणारे ज्येष्ठ सर्पमित्र नामदेव विश्वनाथ उज्जैनकार (रा. यशोधाम कॉलनी, मलकापूर) यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, १३ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की गाडेगाव परिसरातील काही नागरिकांनी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराजवळ सर्प निघाल्याची माहिती सर्पमित्र नामदेव उज्जैनकार यांना दिली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असलेले उज्जैनकार यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सदर सर्प एका सुमारे दोन... - [बहिणीला अखेरचा निरोप दिल्यानंतर भावाचाही मृत्यू; साखरखेर्ड्यात हृदयद्रावक घटना](https://vidharbhlive.com/skhr/): साखरखेर्डा :- बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून तिला अखेरचा निरोप दिल्यानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साखरखेर्डा येथे घडली. या दुहेरी आघातामुळे सुरळकर आणि ढोबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साखरखेर्डा येथील शशिकला सुरळकर (वय 80) यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 12 मार्च रोजी साखरखेर्डा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अंत्यसंस्कारासाठी यवतमाळ येथून आलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही उपस्थित होते. बहिणीला अखेरचा निरोप देऊन सर्वजण घरी परतले असताना राम ढोबळे यांना अचानक तीव्र... - [मलकापुरात भरधाव दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; 21 वर्षीय युवकाचा मृत्यू, एक जखमी](https://vidharbhlive.com/mlk-151/):   मलकापूर : – भरधाव वेगाने चालविलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटून पुलाच्या कठड्याला धडक लागल्याने 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जखमी युवकाच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य प्रदीप कुधळे (वय 20, रा. आंबेगाव रोड, ता. जाफ्राबाद, जि. जालना, सध्या रा. पंतनगर, मलकापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, 25 जानेवारी रोजी शुभम देविदास वैसाने हे एमएच-35 बीबी 6172 क्रमांकाची मोटारसायकल चालवत होते, तर आदित्य कुधळे हे त्यांच्या मागे बसलेले होते. एमएसएम इंग्लिश हायस्कूलसमोरील वळणावरील पुलाजवळ येताच दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालविल्याने... - [जवळखेड येथे तीन घरफोड्या; 1 लाख 10 हजारांची रोकड लंपास!](https://vidharbhlive.com/jsksjdodb/): देऊळगाव राजा :- तालुक्यातील जवळखेड गावात मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जवळखेड येथील शेतकरी देविदास आश्रुबा गाटोळे (वय 44) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, 10 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी गावातील काही घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. देविदास गाटोळे यांच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले 10 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतर शांताबाई कुंडलिक गाटोळे यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत ठेवलेले... - [रानडुकराला वाचवताना कारचा अपघात; चौघेजण जखमी, जीवितहानी टळली](https://vidharbhlive.com/accident-13/): देऊळगाव कुंडपाळ :- देऊळगाव कुंडपाळ-आमराई पाटी मार्गावर अचानक रस्त्यावर आलेल्या रानडुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चारजण जखमी झाले असून चारचाकी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटील नरवाडे हे पुणे येथील आपल्या मित्रांसह चारचाकी (एमएच 14 एमव्ही 8967) ने देऊळगाव कुंडपाळकडे येत होते. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असताना अचानक एक रानडुक्कर रस्त्यावर आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या कारने रस्त्यालगत रमेश भानापुरे यांच्या शेतात उभी असलेल्या दुचाकीला (एमएच 28 बीएन 3212) जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश पाटील नरवाडे तसेच त्यांच्यासोबत... - [ज्येष्ठ विधितज्ञ ॲड. महादेवसिंह रावळ यांचे निधन; मलकापूरात हळहळ](https://vidharbhlive.com/jsjosxbdkn/): मलकापूर : – शहरातील ज्येष्ठ विधितज्ञ तथा माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांचे वडील ॲड. महादेवसिंह चंद्रसिंह रावळ (रा. शास्त्री नगर, मलकापूर) यांचे आज बुधवारी (दि. 11 ) सायंकाळी सुमारे 5.30 वाजता आजारपणामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वकिली क्षेत्रासह मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ॲड. महादेवसिंह रावळ यांनी तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसाय करत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू स्वभावामुळे त्यांनी विधी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना न्यायाच्या लढ्यात आधार मिळाला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वकिली क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार... - [धान्य विक्रेत्याच्या मुलीची कर्तृत्वगाथा; रोशनी तिवारी सीए परीक्षेत उत्तीर्ण](https://vidharbhlive.com/bsnjzzpzb/): मलकापूर :कष्टाची किमया आणि जिद्दीची ताकद असेल तर कोणतेही स्वप्न दूर राहत नाही, याचे प्रेरणादायी उदाहरण मलकापूर येथील कु. रोशनी तिवारी हिने घालून दिले आहे. धान्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या मुलीने देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत यशाचा मानाचा तुरा रोवला आहे. मलकापूरच्या जुन्या गाव परिसरातील रहिवासी विजय जगदीश तिवारी हे धान्य विक्रीचा व्यवसाय करून कुटुंब चालवतात. मर्यादित आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत कु. रोशनी तिवारी हिनेही चिकाटी, अथक परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर सीए परीक्षेत यश संपादन केले. देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या... - [टाकळी वाघजाळ येथे 29 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!](https://vidharbhlive.com/jsjsishsj/): मोताळा : – तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथे एका 29 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी उघडकीस आली. अंकुश प्रल्हाद हरमकार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हरमकार यांनी त्यांच्या घरातील खांबाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि आजारपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. - [नाकाबंदीत कारमधून धारदार गुप्ती जप्त; युवक पोलिसांच्या ताब्यात!](https://vidharbhlive.com/sksbdkdb/): देऊळगाव राजा :- पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका कारमधून विनापरवाना धारदार गुप्ती आढळून आल्याने एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 9 मार्च रोजी सायंकाळी देऊळगाव राजा-सिंदखेड राजा मार्गावरील जनता सेवा जिनिंगसमोर करण्यात आली. पोलिस संशयित वाहनांची तपासणी करीत असताना एमएच 12 जीएफ- 8067 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये तलवारीसारखी धारदार गुप्ती आढळून आली. या प्रकरणी राहुल भास्कर झोरे (वय 33, रा. माळीपुरा, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गुप्तीची मुठ स्टीलची असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईदरम्यान अंदाजे 1... - [मेहुणाराजा येथे दुकानात घुसून महिलेला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा!](https://vidharbhlive.com/crime-17/): देऊळगाव राजा : – तालुक्यातील मेहुणाराजा येथे दुकानात घुसून एका महिलेला धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना 8 मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिती बाबासाहेब नांदवे (वय 28, रा. दगडवाडी, ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार उद्धव उत्तम सुरडकर (वय 34 ), धोडिंबा सिताराम बनसोडे (वय 38 ), अमोल मुर्कीदा बनसोडे (वय 25 ) आणि संतोष सुरडकर (वय 25, सर्व रा. सुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या आपल्या दुकानात असताना आरोपी तेथे आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवीगाळ करू... - [मलकापूर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील झाडे तोड प्रकरण; चौकशीची मागणी, प्रहारचा आंदोलनाचा इशारा](https://vidharbhlive.com/nskzkzlzb/): मलकापूर : शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील हिरवीगार मोठी झाडे कोणतीही परवानगी न घेता कापण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही दोन दिवस उलटून न.प. प्रशासनाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी दिला आहे. यासंदर्भात अजय टप यांनी १० मार्च रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मलकापूर नगर परिषद अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास मोठी हिरवीगार झाडे... - [मलकापूर बसस्थानकात लागलेली आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने आटोक्यात; मोठा अनर्थ टळला!](https://vidharbhlive.com/jzksjdodb/): मलकापूर : – येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (दि. 10 ) रात्री सुमारे 9.10 वाजताच्या सुमारास कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार दीपक ईटणारे व उमेश ईटणारे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी वासुदेव भोपळे व रामभाऊ येनकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाच्या जवळच विद्युत वितरण कंपनीचे मोठे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले... - [सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू; रुग्णवाहिकेवर नातेवाइकांचे गंभीर आरोप!](https://vidharbhlive.com/khm-21/): खामगाव :- पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगावजवळील जनुना येथे सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. मंगेश प्रकाश कांबळे (वय 32 ) असे मृतक सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात पकडलेला साप सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी मंगेश कांबळे हे जनुना तलाव परिसरात गेले होते. यावेळी सापाने अचानक त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अकोल्याला नेत असताना मार्गातच रुग्णवाहिका चालकाने पैशांच्या कारणावरून टेंभुर्णा येथून रुग्णवाहिका परत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणल्याचा आरोप... - [अंत्री येथे 24 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!](https://vidharbhlive.com/mtl-14/): मोताळा : – तालुक्यातील अंत्री येथे 24 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 9 ) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस मोहन जवरे (वय 24, रा. अंत्री) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत रविदास जवरे यांनी पोलिसांत माहिती दिली. रविवारी सायंकाळी सुमारे सव्वाचार वाजताच्या सुमारास ते घरी असताना त्यांच्या पुतणी माधुरी हिने फोन करून तेजसने घरात गळफास घेतल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच चंद्रकांत जवरे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तेजस हा घरातील छताच्या पंख्याला रेशीम दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच... - [दशक्रिया विधीदरम्यान मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० जण जखमी!](https://vidharbhlive.com/mhkr-2/): मेहकर :- तालुक्यातील हिवरा आश्रमजवळील रायपूर परिसरात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.8 ) सकाळी घडली. या घटनेत सुमारे 25 ते 30 जण जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील हभप. विठ्ठल महाराज काळे यांचे 27 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त कुटुंबीय व नातेवाईक पैनगंगा नदीकाठी धार्मिक विधीसाठी गेले होते. विधी सुरू असतानाच परिसरातील आग्या मोहोळावरील मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. यात जगन्नाथ काळे, उमेश काळे, सत्यभामा काळे, वसंता बुंधे, पंचफुला काळे, मारुती काळे, उकंडा... - [महिलांशी गैरवर्तन रोखल्याचा राग; अॅड. संचेती यांच्यावर मलकापूर रेल्वेस्थानकात कटरने हल्ला!](https://vidharbhlive.com/mlk-150/): मलकापूर : – शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्सचे संचालक अॅड. अमरकुमार संचेती यांच्यावर मलकापूर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. जखमी संचेती यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. संचेती हे आपल्या मुलीला अमरावती–सुरत रेल्वेत बसविण्यासाठी दुपारी सुमारे 12.30 वाजता मलकापूर रेल्वे स्थानकात आले होते. ते फलाट क्रमांक 1 वर गाडीची प्रतीक्षा करत उभे असताना एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. संबंधित तरुण महिलांशी, विशेषतः तरुणींशी अयोग्य वर्तन करत असल्याचे पाहून संचेती यांनी त्याला समज... - [ट्रीपला जाऊन येतो म्हणत घरातून निघाला; तळणीचा ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता!](https://vidharbhlive.com/mtl-13/):   मोताळा :- ट्रीपला जाऊन येतो असे सांगून घरातून निघालेला ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील तळणी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील जनार्धन गणपत कुयटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा गजानन जनार्धन कुयटे (वय ३०) हा ७ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ट्रीपला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्याकडे एमएच २८ बीडब्ल्यू ८९४८ क्रमांकाची दुचाकी होती. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला असता त्याचा कुठेही मागमूस लागला... - [पोलीस दलातील शांत, नम्र चेहरा हरपला; हेड कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके यांच्या मृत्यूने खळबळ..](https://vidharbhlive.com/ndkdndkeb/): बुलढाणा :- जिल्हा पोलीस दलाला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुलढाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके यांनी मेहकर तालुक्यातील बाबुलखेड येथील शेतातील विहिरीत उडी घेतल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबराव शेळके हे सध्या बुलढाणा पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. रविवारी बाबुलखेड परिसरातील एका शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पुढील तपासासाठी व... - [आनंदाच्या लग्नसोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; क्षणात उसळली भीतीची किंकाळी, ७ जखमी; मलकापूर तालुक्यातील घटना](https://vidharbhlive.com/ksosnzxpxb/): मलकापूर (दिपक इटणारे ):- लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची सुरुवात… पण अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या एका लग्नसोहळ्यावर अचानक संकट कोसळले आणि आनंदाचे वातावरण क्षणात भीतीच्या सावटाखाली गेले. हजारो मधमाश्यांच्या थव्याने लग्नमंडपावर हल्ला चढवल्याने उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेत चार महिला व तीन पुरुष असे एकूण सात जण गंभीर जखमी झाले असून तिघांवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिर परिसरात दाभाडी येथील चोपडे परिवारातील नवरी आणि धरणगाव येथील चौधरी परिवारातील नवरदेव यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात सुरू... - [कर्नाटकच्या व्यापाऱ्याला मलकापूरात मारहाण करून लुटले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल](https://vidharbhlive.com/jsoskxob/): मलकापूर : शहरात बाहेरगावाहून आलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बांबू खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी कर्नाटकातून आलेल्या व्यापाऱ्याला फसवून मोकळ्या मैदानात नेण्यात आले आणि त्याच्यावर हल्ला करून सुमारे दोन लाख रुपयांची लूट करण्यात आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदविला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास मूर्ती नारायणस्वामी (वय ३२, रा. हेलेअळेगुंडी बंडा, जिल्हा चिकबळ्ळापूर, कर्नाटक) हे बांबू खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवहाराच्या निमित्ताने ते ६ मार्च रोजी मलकापूर येथे आले होते. दरम्यान काही व्यक्तींनी त्यांना माल दाखविण्याचे आमिष दाखवत रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे बोगद्याखालून मुक्ताईनगर मार्गावरील एम.एस.डब्ल्यू महाविद्यालयाजवळील मोकळ्या मैदानात... - [दाताळा येथे डीपीवर काम करताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू!](https://vidharbhlive.com/bsizjzozsb/): मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथे डीपीवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने २५ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ७ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा गावातील पिंप्री गवळी फाट्यावरील डीपी बंद करून तिची दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी डीपीवर काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने शुभम रामकृष्ण वानखेडे (वय २४, रा. वाडी ता. नांदुरा, जि. बुलढाणा) याला जोरदार विद्युत शॉक लागला. त्यामुळे तो डीपीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने त्याला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत... - [फोन न उचलल्याच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण; मलकापूर ग्रामीण पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!](https://vidharbhlive.com/jsizjxpxb/): मलकापूर : – तू माझा फोन का उचलत नाही असा जाब विचारत घरात घुसून पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विटाळी (ता. नांदुरा) येथे घडली. याप्रकरणी सौ. शितल प्रकाश लवटे (वय २७, रा. विटाळी ता. नांदुरा) यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्या घरी स्वयंपाक करत असताना त्यांचे पती प्रकाश लवटे जेवण करत होते. त्यावेळी आरोपी आकाश प्रेमसुख काकर व प्रेमसुख चांगो काकर (रा. संताजी नगर, मलकापूर) हे त्यांच्या घरी आले. तुझा पती माझा फोन उचलत नाही असे म्हणत त्यांनी घरात... - [उसनवारीचे पैसे मागितल्याने मारहाण; चौघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल!](https://vidharbhlive.com/hskzjxpxb/): मलकापूर :- उसनवारीचे राहिलेले पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर चार जणांनी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रेमसुख चांगो काकर (रा. संताजी नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रकाश किसन लवटे याला त्यांनी उसनवारीने पैसे व काही वस्तू दिल्या होत्या. त्या पैशांची उर्वरित रक्कम मागण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजता गेले असता आरोपी प्रकाश लवटे याने शितल प्रकाश लवटे, विठ्ठल किसन लवटे व किसन लवटे (सर्व रा. विटाळी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांच्या समक्ष वाद घालत शिवीगाळ केली.... - [मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा!](https://vidharbhlive.com/jskzjzlzbzi/): मलकापूर : – तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय युवकाने घरात गळफास घेतल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण संजय अढाव (वय १७, रा. हरसोडा ता. मलकापूर) हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. ५ मार्च रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान तो आपल्या घरात झोक्याच्या दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत सचिन गजानन अढाव (वय ३५) यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. - [नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत; दोघांविरुद्ध गुन्हा!](https://vidharbhlive.com/nskznxlxb/): खामगाव : – शहरातील नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौतम मोहन इंगळे (रा. वरखेड खुर्द, ता. शेगाव) यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, नॅशनल हायस्कूलसमोरील रस्त्यावर काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे इंगळे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता संकेत नंदू कदम (रा. चांदमारी, खामगाव) व दुर्गेश संतोष सोनुने (रा. बाळापूर फैल, खामगाव) यांनी वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी आरोपींपैकी एकाने चाकू काढून परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर... ## Pages - [Privacy Policy](https://vidharbhlive.com/privacy-policy/): This Privacy Policy describes Our policies and procedures on the collection, use and disclosure of Your information when You use the Service and tells You about Your privacy rights and how the law protects You. We use Your Personal data to provide and improve the Service. By using the Service, You agree to the collection and use of information in accordance with this Privacy Policy. This Privacy Policy has been created with the help of the Privacy Policy Generator. Interpretation and Definitions Interpretation The words of which the initial letter is capitalized have meanings defined under the following conditions. The... - [Disclaimer](https://vidharbhlive.com/disclaimers/): Interpretation and Definitions Interpretation The words of which the initial letter is capitalized have meanings defined under the following conditions. The following definitions shall have the same meaning regardless of whether they appear in singular or in plural. Definitions For the purposes of this Disclaimer: Company (referred to as either “the Company”, “We”, “Us” or “Our” in this Disclaimer) refers to VidharbhLive. Service refers to the Website. You means the individual accessing the Service, or the company, or other legal entity on behalf of which such individual is accessing or using the Service, as applicable. Website refers to VidharbhLive, accessible... - [About Us](https://vidharbhlive.com/contact-us/): Welcome To Vidharbhlive.com Vidharbhlive.com is a Professional ,News Portal, Sarkari Yojana Update Portal Platform. Here we will only provide you with interesting content that you will enjoy very much. We are committed to providing you the best of ,News Portal, Sarkari Yojana Update Portal, with a focus on reliability and ,News Portal, Sarkari Yojana Update Portal. we strive to turn our passion for News Portal, Sarkari Yojana Update Portal into a thriving website. We hope you enjoy our Education,News Portal, Sarkari Yojana Update Portal as much as we enjoy giving them to you. I will keep on posting such valuable anf knowledgeable information on my Website for... - [Terms and Conditions](https://vidharbhlive.com/terms-and-conditions/): Please read these terms and conditions carefully before using Our Service. Interpretation and Definitions Interpretation The words of which the initial letter is capitalized have meanings defined under the following conditions. The following definitions shall have the same meaning regardless of whether they appear in singular or in plural. Definitions For the purposes of these Terms and Conditions: Affiliate means an entity that controls, is controlled by or is under common control with a party, where “control” means ownership of 50% or more of the shares, equity interest or other securities entitled to vote for election of directors or other... - [Contact Us](https://vidharbhlive.com/about-us/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)